⚡सावंतवाडी ता.२५-: श्री संत रोहिदास सहकारी पतसंस्थेच्या सभासदांना नऊ टक्के दराने डिव्हिडंट देण्याची घोषणा पतसंस्थेचे अध्यक्ष गोविंद बाळा वाडकर यांनी विसाव्या आदी मंडळ वार्षिक बैठकीमध्ये केली असून साडेचार लाख रुपयांचा नफा संस्थेला झाला असून संस्था वर्गामध्ये गेली असल्याची ही माहिती त्यांनी दिली
सावंतवाडी येथील समाज मंदिर सभागृहामध्ये पतसंस्थेच्या सभासदांची विसावी आदी मंडळ वार्षिक बैठक संपन्न झाली या बैठकीस उपाध्यक्ष बाबुराव चव्हाण संचालक गणेश म्हापणकर, प्रकाश रेडकर मंगेश कदम भरत लाखे व्यवस्थापक सदानंद चव्हाण यांच्यासह उमाकांत वारंग लाडू जाधव मनोहर वेंगुर्लेकर संजना आंबेडकर दशरथ वाडकर सौ तृप्ती गावडे नारायण केसरकर आदी कार्यकारणी पदाधिकारी ठेवीदार कर्मचारी आणि हितचिंतक उपस्थित होते
सुरुवातीला अध्यक्ष वाडकर यांनी 26 लाख 37 हजार 444 रुपयांचा रुपयांचे नफा तोटा पत्र जाहीर केले यामध्ये निवड नफा चार लाख 98 हजार 88 रुपयांचा झाल्याचे त्यांनी सांगितले यावेळी त्यांनी 2023 -24 चे अंदाजपत्रक सादर केले यावेळी त्यांनी भाग भांडवल वाढवण्याकरिता विविध योजना अमलात आणण्याचे आवाहन केले बैठकीमध्ये सुरुवातीला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली त्यानंतर सभेची सूचना व कार्यक्रम पत्रिकेचे वाचन व्यवस्थापक सदानंद चव्हाण यांनी केले त्याचबरोबर मागील अधिमंडळ वार्षिक सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले त्यानंतर 2022 23 च्या 23 पत्रक ताळेबंद व नफा तोटा पत्रकाचे वाचन करून मंजुरी देण्यात आल
अंदाज पत्रकापेक्षा कमी अधिक झालेल्या खर्चासहित मंजुरी देण्यात आली शेत तपासणीचा नियुक्ती करण्याबाबत ठराव करण्यात आला संचालक मंडळाने शिफारस केल्याप्रमाणे नफा विभागणी ही मंजूर करण्यात आली त्यानंतर अध्यक्षांच्या परवानगीने आयत्या वेळेच्या विषयावर चर्चा झाली
चौकट
बाजारपेठेतील संत गाडगेबाबा भाजी मंडई त कार्यालय स्थलांतरित करणार
सावंतवाडी नगर परिषदेच्या संत गाडगेबाबा भाजी मंडई च्या प्रस्तावित इमारतीमध्ये सहकारासाठी विशेषता श्री संत रोहिदास सहकारी पतसंस्थे च्या मुख्य कार्यालय करिता पहिल्या मजल्यावर जागा उपलब्ध देण्याची विनंती करण्यात आली असून त्याला मंजुरी मिळेल असा विश्वास अध्यक्ष वाडकर यांनी व्यक्त केला.
पतसंस्थेकडे पुरेसा इमारत निधी उपलब्ध असून अधिक उन्नती होण्याकरिता पतसंस्थे च्या कार्यालयाची जागा या नव्या भाजी मंडईमध्ये घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले दरम्यान आत्ता असलेल्या मुख्य कार्यालयासाठी दोन कोटी रुपयांचे तारण जागेसाठी त्यावेळी देण्यात आले होते असे ते म्हणाले
