⚡वैभववाडी ता.२५ संजय शेळके-: शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांचा वाढदिवस वैभववाडी तालुक्यात विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात येणार…
बुधवारी दिनांक 26 जुलै रोजी सकाळी 9 वाजता ग्रामीण रुग्णालय वैभववाडी येथे रतकदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे, त्याचप्रमाणे 27 जुलै रोजी वैभववाडी दत्त मंदिर येथे उद्धव साहेबांच्या दीर्घायुष्यासाठी अभिषेक करण्यात येणार आहे, तसेच दुपारी 4 वाजता ज्येष्ठ नागरिकांना सतीश सावंत यांच्याकडून आंबेडकर भवन येथे कल्पवृक्ष वाटप करण्यात येणार आहे. तसेच तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय वैभववाडी व प्राथमिक आरोग्य केंद्र उंबर्डे येथील रुग्णांना फळ वाटप करण्यात येणार आहे.*या कार्यक्रमासाठी शिवसेना जिल्हा नेते श्री सतीश सावंत,जिल्हा नेते अतुल रावराणे ,युवानेते संदेशजी पारकर, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, उपजिल्हाप्रमुख नंदू शिंदे आदी पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
*तरीही यावेळी तालुक्यातील शिवसेना ,महिला आघाडी, युवा सेना त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी वेळेत उपस्थित राहावे असे आवाहन तालुका प्रमुख मंगेश लोके व युवासेना जिल्हाचिटणीस स्वप्निल धुरी यांनी केल आहे.
