निलेश राणे यांनी घेतली ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांची भेट…

२५/१५ व पर्यटन विषयक कामांबाबत झाली सकारात्मक चर्चा:कुडाळ – मालवण मधील विकास कामांना मिळणार गती

⚡ओरोस ता.२५-: भारतीय जनता पक्षाचे कुडाळ मालवण विधानसभा निवडणुक प्रभारी, तथा माजी खासदार निलेश राणे यांनी आज, कुडाळ मालवण मतदारसंघातील विविध विकास कामांसंदर्भात ग्रामविकास तथा पर्यटन मंत्री गिरीष महाजन यांची भेट घेतली. यावेळी कुडाळ व मालवण तालुक्यात २५/१५ तसेच पर्यटन विषयक विविध विकासकामांची यादी निलेश राणे यांनी ग्रामविकासमंत्री गिरीष महाजन यांना सुपूर्द केली.

कुडाळ व मालवण तालुक्यात भारतीय जनता पार्टी कडून जनसंपर्क अभियान राबविण्यात आले होते, यावेळी भेट दिलेल्या ठिकाणावरून सुचविण्यात आलेल्या विकासकामांना निधी उपलब्ध व्हावा यासाठी निलेश राणे यांनी आज ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांची भेट घेत विकासनिधीची मागणी केली, यावेळी आमदार नितेश राणे हे देखील उपस्थित होते.

You cannot copy content of this page