शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांनी वेधले कृषीमंत्र्यांचे लक्ष
⚡कणकवली ता.२०-: भात पिक विमा नोंदणीस मुदतवाढ मिळावी अशी मागणी महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री नाम. धनंजय मुंडे यांच्याकडे शिवसेनेचे सिंधुदुर्ग जिल्हा प्रमुख संजय आग्रे यांनी मुंबई येथे भेट घेत केली आहे.
कृषिमंत्री नामदार धनंजय मुंडे यांना शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांनी निवेदन सादर केले यावेळी त्यांच्यासमवेत शिवसेना विधानसभा प्रमुख संदेश पटेल, बापू धुरी उपस्थित होते.
चालू वर्षी पाऊस उशिरा सुरू झाल्यामुळे भात पिकाची लागवडीचे काम लांबणीवर पडलेले आहे सध्या शेतकरी भात पिकाच्या कामांमध्ये व्यस्त आहेत तरी भात पीक विमा नोंदणी करण्याची मुदत ही ३१ जुलै २०२३ पर्यंत आहे. सदर मुदतीमध्ये शेतकरी आपल्या शेतीच्या कामांमध्ये व्यस्त असल्यामुळे भात पीक विमा उत्तरेविणे करिता पुरेसा वेळ देऊ शकत नाहीत तसेच पावसाचे प्रमाण पूर्ण राज्यात कमी असले कारणाने दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर आले आहे परिणामी मुदतीमध्ये भात पीक विमा उतरवू शकत नाहीत तरी भात पिक विमा नोंदणीसाठी ३१ ऑगस्ट २०२३ पर्यंत मुदतवाढ मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे.
