चराठ्यात पावसामुळे अनुचित घटना घडल्यास आपत्कालीन टीम सज्ज…

अमित परब:तर विशाल परब यांनी देखील दिलं मदतीचा आश्वासन…

⚡सावंतवाडी ता.२०-: गेली चार ते पाच दिवस सिंधूदुर्ग जिल्ह्य़ात ज्या प्रमाणात मुसळधार पाऊस पडत आहे. त्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी चराठा गावाचे उपसरपंच अमित परब यांनी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना एकत्र घेत चराठे गावात कुठलीही पडझड कीवा कुठलीही अनुचित घटनेला सामोरे जाण्यासाठी लगेचच मदत कार्य मिळावी, या हेतूने आपली टीम सज्ज ठेवली आहे.

या टीम मधे भारतीय जनता पक्षाचे शक्ती केंद्र प्रमुख ओंकार पावसकर ग्रामपंचायत सदस्य अमर चराठकर, सदस्य अविनाश जाधव. महेश पांचाळ श्रीधर बोंद्रे, सुनिल परब, विलास परब मुकेश परब, रामचंद्र मसुरकर, रजत ऐकणेकर, दत्तप्रसाद कंलगूटकर, मंगेश सुभेदार, गजानन परब, क्लाटस फर्नांडिस. यांच्यासह अनेक कार्यकर्ते त्याचा साथीला आहेत. दरम्यान कूठलीही मदत लागल्यास भारतीय जनता पक्षाचे युवा नेतृत्व श्री. विशाल परब यांनी मदतीचा हात देण्याचे आश्वासन दीले..

You cannot copy content of this page