सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद अशासकीय सदस्यपदी दादा कुडतरकर

⚡कणकवली ता.२०-: जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी महाराष्ट्र शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे अंतर्गत जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते सीताराम उर्फ दादा कुडतरकर कणकवली यांची सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर अशासकीय सदस्य म्हणून निवड केली आहे.

गत 3 ते 4 वर्षे त्यांनी सिंधुदुर्ग जिल्हा संघटक,ग्राहक पंचायत,महाराष्ट्र राज्य म्हणून ग्राहकांची फसवणूक होऊ नये यासाठी ग्राहक संरक्षण कायद्यानुसार जनजागृतीचे भरीव काम केले आहे .जनजागृती उपक्रमासाठी सहभाग दर्शवून संघटना वाढीसाठी सिंधुदुर्ग ग्राहक पंचायत जिल्हाध्यक्ष सुरेश पाटील यांच्या सहकार्याने तालुका संघटना स्थापित करण्याचे महत्वपूर्ण कार्य केले आहे.याशिवाय विद्यमान अध्यक्ष,कणकवली तालुका पेन्शनर असो, माजी असिस्टंट गव्हर्नर रोटरी क्लब सिंधुदुर्ग,माजी जिल्हाध्यक्ष जेष्ठ नागरिक सेवा संघ सिंधुदुर्ग,जिल्हा जेष्ठ नागरिक सनियंत्रण समिती सदस्य,माजी अध्यक्ष वैश्य समाज कणकवली तालुका,समन्वयक आम्ही कणकवली संस्था,सदस्य टायगर फोर्स,सदस्य गोपुरी आश्रम कणकवली,प्रवासी संघ कणकवली अशा अनेकविध संस्थांमधून सामाजिक बांधिलकीची कामे करीत आहेत,वनविभाग सावंतवाडी येथे कार्यरत असताना सन 91-92 मधील लातूर उस्मानाबाद येथील भूकंपग्रस्त अन अवर्षण ग्रस्त भागात जाऊन वनविभाग सावंतवाडी द्वारा 15 ट्रक जळाऊ लाकूड समयोचित पुरवठा केले असून सिंधुदुर्ग ग्राहक संरक्षण परिषदेवर निवड झाल्याने समाजाच्या सर्वच स्तरातून त्यांचेवर अभिनंदन होत आहे .

You cannot copy content of this page