खासदार जुगल शर्मा यांचे आश्वासन*
मालवण : जिल्ह्याच्या विकासासाठी खासदार विनायक राऊत संसदेत आवाज सातत्याने उठवत असतात.येथील विकास कामासाठी खासदार विनायक राऊत यांचे चांगले प्रयत्न असून या पुढे आम्ही ही सहकार्य करू असे आश्वासन खासदार जुगल किशोर शर्मा यांनी केले. सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आलेल्या खासदारांच्या केंद्रीय समितीतील अध्यक्ष गिरीश बापट , खासदार विनायक राऊत यांच्यासह अन्य खासदारांनी आज किल्ले सिंधुदुर्गला भेट देत पाहणी केली . यावेळी शिवराजेश्वर मंदिरात जात छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेतले. मिनी पार्लमेंट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खासदारांच्या ३० सदस्यांच्या केंद्रीय समितीने आज चिपी विमानतळास भेट देत पाहणी केली . त्यानंतर या समितीतील अध्यक्ष गिरीश बापट , खासदार विनायक राऊत , खासदार जुगल किशोर शर्मा , खासदार सुदर्शन भगत यांनी येथील किल्ले सिंधुदुर्गला भेट दिली . यावेळी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर , उपजिल्हा प्रमुख बबन शिंदे , तालुकाप्रमुख हरी खोबरेकर , बाबी जोगी , गणेश कुडाळकर , मंदार केणी , यतीन खोत , उमेश मांजरेकर , श्वेता सावंत , सेजल परब , पूनम चव्हाण , तृप्ती मयेकर , पूजा तळाशीलकर , प्रांत वंदना खरमाळे , तहसीलदार अजय पाटणे , गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव , प्रभाकर जाधव यांच्यासह अन्य अधिकारी , पदाधिकारी उपस्थित होते . किल्ल्यावर वायरी भुतनाथ ग्रामपंचायत व किल्ले रहिवाशांच्यावतीने खासदारांचे स्वागत करण्यात आले . यावेळी खासदार जुगल किशोर शर्मा म्हणाले , आज आम्हा सर्वांचे प्रेरणास्थान , महापुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरास भेट देता आली. जिल्ह्याच्या महत्वाकांक्षी चिपी विमानतळ प्रकल्पास आज भेट देत पाहणी करण्यात आली असून लवकरच हे विमानतळ सुरू होईल . येथील विकासकामांसाठी खासदार विनायक राऊत हे चांगले प्रयत्न करत असून त्यांना यापुढे आमचेही सहकार्य राहील असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले .
