युवा सेना विभागप्रमुख रोहित पावसकर यांचा पलटवार
⚡वैभववाडी ता.१७-: अरविंद रावराणे यांनी आपल्या राजकिय अस्तित्वाचा विचार करावा.अरविंद रावराणे यांचे सद्या भाजप पक्षातले स्थान काय आहे हे त्यांनी प्रथम पहावे. आपल्याला सद्या पक्षात कोणतेही काम नसल्यामुळे आपण युवा सेना जिल्हा प्रमुख श्री सुशांत नाईक यांच्यावर वरीष्ठांना खुश ठेवण्यासाठी टीका करण्याचा केविलवाना प्रयत्न करीत आहात. असी ठिका प्रसिद्धी पत्रकाद्वारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे युवा सेनेचे विभाग प्रमुख रोहीत पावसकर यांनी केले आहे.
आपण कितीही प्रयत्न केलात तरी सद्या राणेसमर्थक भाजप मध्ये तुम्हाला आगामी पंचायत समिती वा जिल्हापरिषद निवडणुकीत कोणतेही तिकीट मिळणार नाही. याची आपल्याला खात्री झालेली आहे. आपण गेली अनेक वर्षे वैभववाडीच्या सक्रीय राजकारणात आहत. शिवसेनेमुळे व राणे यांच्या मुळे आपण सभापतीपदापर्यत पोहोचलात. पण आपणाला कोणतेही प्रशासकीय ज्ञान नसल्यामुळे आपण सद्याच्या राजकारणात खूपच मागे राहीला आहात. सुशांत नाईक हे अज्ञानी नसून आपले नेते नारायण राणे यांना जिल्ह्यातून विधानसभा निवडणूकीत हद्दपार करणारे शिवसेनेचे डॅशिंग नेतृत्व व एक अभ्यासू व कर्तृत्ववान आमदार वैभव नाईक यांचे भाऊ आहेत. सुशांत नाईक यांनी आपल्यावर युवासेना जिल्हाप्रमुख या पदाची जबाबदारी आल्यावर कणकवली वैभववाडी देवगड या विधानसभा मतदार संघात, ज्या-ज्या ठिकाणी सर्वसामान्य लोकांचे मूलभूत प्रश्न आहेत, ते जाणुन घेण्यासाठी ते प्रयत्न करतात व ते स्वतः ग्रामीण रुग्णालयात येऊन कर्मचारी व रुग्णाना समस्या विचारतात. त्यामुळे त्यांना अपु-या माहितीच्या आधारे बोलता, असे म्हणने चुकिचे आहे. उलट आपणच कुठलीही माहिती न घेता दुस-यांनी सांगितलेल्या आधारे टिका करण्याचा प्रयत्न करत आहात. सुशांत नाईक यांना येथील डाक्टर कर्मचारी यांनी आपल्या व्यथा सांगितल्या आहेत. परंतु आपण रोज वैभववाडीमध्ये असता त्यावेळी आपण केव्हा रुग्णालयामध्ये किंवा अन्य कुठल्या शासकीय कार्यालयात जाऊन नागरिकंच्या समस्या जाणुन घेता का?
महाविकास आघाडीचे सरकार आता आले. परंतु गेली 30 वर्षे केंद्रीय मंत्री नारायण राणे हे या जिल्ह्याचे पालकमंत्री होते व गेल्या नऊ वर्षामध्ये या विधानसभेचे आमदार म्हणुन नितेश राणे हे आहेत. यांनी का लक्ष दिले नाही? या रुग्णालयांच्या समस्येकडे. स्वतः आमदार नितेश राणे यांनी दिलेल्या 102 रुग्णवाहीकेला सद्या साधे डिझेल मिळत नाही. म्हणुन सद्या रुग्णवाहीका बंद अवस्थेमध्ये आहे. रुग्णालयात सद्या जनरेटर नाही. रक्त तपासणी होत नाही. आजच येथील क्लर्क यांनी दारूपिऊन धिंगाना घातला. गेले वर्ष 7-8 महिने त्यांचे असे वर्तन चालू आहे. पण या समस्यांकडे आपले आमदार लक्ष देत नाहीत. मूळात आपल्याला यातले काहीच माहित नसणार. कारण आपण किंवा आपले पदाधिकरी कधीच रुग्णालयाकडे केव्हा फिरकतच नाहीत. त्यामुळे आपल्याला सर्वसामांन्यांचे किंवा रुग्णांचे काय हाल होतात हे कसे समजणार? त्यासाठी हवेतून नाही तर जमिनीवरून चालावे लागते. नुसता इमरतीला निधी देऊन चालत नाही. त्यासाठी त्या इमारतीमध्ये रुग्णांच्या काय समस्या आहेत, कर्मचारी वर्गाच्या काय समस्या आहेत हे सुद्धा जाणुन घ्यावे लागते.
