केर भेकुर्लीत श्रावणधारा महोत्सव

४ ते ६ ऑगस्टला आयोजन; रानभाज्या प्रदर्शन आणि बरेच काही

⚡दोडामार्ग,ता.१६-: ग्रुप ग्रामपंचायत केर भेकुर्लीचा श्रावणधारा महोत्सव ४, ५ आणि ६ ऑगस्टला होणार असल्याची माहिती ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतकडून देण्यात आली. विविध क्षेत्रातील मान्यवर सत्कार, संस्कृती जोपासणूक, स्वच्छता ते समृद्धी, गाव विकास संकल्प, महिला स्वावलंबन, संयुक्त दशावतार तसेच महत्वाचे म्हणून गाव शिवारातील तब्बल ३५ रानभाजा यांचे प्रदर्शन असे तीन दिवस कार्यक्रम होणार आहेत.


ग्रामस्थांचे सांघिक ऐक्य दाखविणारे कार्यक्रम दरवर्षी होतात. केर – भेकुर्ली येथील कार्यालयात श्रावणधारा कार्यक्रम नियोजनासाठी बैठक झाली. यावेळी विद्यमान सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, माजी सरपंच व पदाधिकारी, गावातील विविध मंडळाचे प्रतिनिधी, युवक, महिला बचत गट प्रतिनिधी, प्रतिष्ठित ग्रामस्थ आदी उपस्थित होते. ग्रामस्थ म्हणाले, श्रावणधारा महोत्सव म्हणजे गावाच्या सांघिकतेचा सण आहे. यावर्षी हा महोत्सव तीन दिवस चालणार आहे. गावात विविध कामाच्या माध्यमातून गाव किंवा ग्रामपंचायत यांना सहकार्य करणाऱ्या ग्रामस्थांचा या निमित्ताने सन्मान केला जाणार आहे.


यावर्षी श्रावणधारा महोत्सवात संस्कृतीची जोपासना करणा-या व्यक्तींचा सन्मान, ज्यामध्ये श्री देव पूर्वाचारी पारंपरिक दशावतार नाटय मंडळातील कलाकार, चपय नृत्य कलाकार, “माझ्या माहेरची पैठणी – ओढ गावची” यात गावातील कन्यांना आमंत्रित करून त्यांच्यासाठी स्पेशल खेळ घेणे, “आदर्शगावची पैठणी” .. सोहळा माता – भगिनींचा यामध्ये गावातील महिलांसाठी ५० वयावरील एक गट आणि ५० वयाखालील एक गट अशा दोन गटात छोटे खेळ आणि विजेत्यांना बक्षिस म्हणून पैठणी असणार आहे. रानभाजी प्रदर्शन, पाककला सेंद्रिय पदार्थ, संयुक्त दशावतार नाटयप्रयोग याबरोबरच सन्मान सोहळा यात
गावात जे महिला आणि पुरुष वैदु म्हणून सेवा देत आहेत त्यांचा सन्मान, मुलांचा गुणगौरव आदी कार्यक्रम होणार आहेत.

कलाकार, माजी शिक्षक ,सैनिकांचाही होणार सन्मान

केर - भेकुर्ली गावात दळण - वळणाची कोणतीही सोय नसताना गणेशमूर्ती बनविण्याचे काम गावात करुन मोलाचे कार्य करणाऱ्या मूर्तिकार व अन्य कलाकार यांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान केला जाणार आहे .तसेच

गावातील माजी सैनिक,सेवानिवृत्त शिक्षक यांचाही सन्मान केला जाणार आहे याचबरोबर स्वछता तिथे समृद्धी – विशेष मार्गदर्शन, माझा गाव स्वच्छ गांव – चित्रकला स्पर्धा, श्रावणधारा अन काव्यधारा(स्वरचित कविता गायन, माझा गाव अन निसर्ग )कृतज्ञता, ग्रामपंचायतला केलेल्या सहकार्याची असे कार्यक्रम होणार आहे.

@महोत्सवात जे रानभाजी प्रदर्शन होणार आहे त्यात तब्बल ३५ स्थानिक भाज्या असणार आहेत.
@गाव विकासात कोणत्या गोष्टीची गरज आहे याचे विचार मंथन यावेळी होईल.
@आगामी वर्षभरात गाव विकासाचे ध्येय्यही ठरवले जाईल. @ग्रामपंचायत संबंधित अधिकारी, लोकप्रतिनिधी, मंत्री आणि गाव विकास संकल्पपूर्तीस मदत करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान महोत्सवात करण्यात येणार आहे

You cannot copy content of this page