मनसेचा बांधकाम विभाग कार्यालयास उद्या घेराव

⚡बांदा ता.१६-: सावंतवाडी मतदार संघातील नव्याने डांबरीकरण केलेल्या रस्त्यांची कामे निकृष्ट दर्जाची झाल्याने पहिल्याच पावसात अनेक ठिकाणी चांगले काम केले असे म्हणणाऱ्या ठेकेदारांची पोलखोल झाली आहे. परिणामी रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत व ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांबाबत जाब विचारण्यासाठी मनसे तर्फे सोमवार दि. १७ जुलै रोजी सकाळी ११ वाजता कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग सावंतवाडी यांना घेराव घालून जाब विचारण्यात येणार आहे.

या वेळी सर्व आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी उपस्थित राहावे असे आवाहन मनसे तर्फे माजी उपजिल्हाध्यक्ष व विधी व जनहित कक्ष जिल्हा संघटक अँड.अनिल केसरकर तसेच सावंतवाडी तालुका माजी संपर्क अध्यक्ष महेश परब यांनी केले आहे.

You cannot copy content of this page