⚡कणकवली ता.१६-: कणकवली तालुक्यातील
बिडवाडी (मांगरवाडी) या सामाजिक वारसा लाभलेल्या
सूर्यकांत रामचंद्र जोईल उर्फ पोस्टमन नाना यांचे शनिवार, १५ जुलै रोजी वयाच्या ७५ व्या वर्षी
निधन झाले. ते गावात ‘पोस्टमन नाना’ या टोपण नावाने ओळखले जात.
त्यांच्यावर लहानपणापासून सामाजिक सेवेचे संस्कार होते. गावच्या सामाजिक कार्यात तसेच मदतकार्यात ते नेहमीच अग्रेसर होते.
गरजूंना मदत करण्यात त्यांचा नेहमीच सक्रिय वाटा असे. त्यांच्या निधनामुळे समाजासाठी काम करणारे एक व्यक्तिमत्व हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे. त्यांच्यावर काल रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, विवाहित एक मुली, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. पोस्टमन नाना यांच्या जाण्याने हळहळ व्यक्त होत आहे.
