शिक्षण महर्षी शशिकांत अणावकर यांचे निधन

⚡कुडाळ ता.१६-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामांकित शाळा अशी ख्याती असलेल्या शिवाजी इंग्लिश स्कूल, पणदूर तिठा या प्रशालेचे अध्यक्ष तथा शिक्षक शशिकांत सुंदर अणावकर यांचे आज मध्यरात्री अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यावर कुडाळ येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या पश्यात मुलगा, तीन मुली, भाऊ, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामांकित अशा शिवाजी इंग्लिश स्कूल, पणदूर तिठा या प्रशालेच्या स्थापनेपासून अणावकर सर यांनी विशेष मेहनत घेतली होती. एक अभ्यासू, चिकित्सक व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ख्याती होती. अणावकर सर यांच्या निधनाने शैक्षणिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे.

You cannot copy content of this page