⚡वेंगुर्ला ता.१६-: महाराष्ट्र शासनाच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाच्या अंतर्गत येणा-या महाराष्ट्र गोसेवा आयोग अधिनियम २०२३ स्थापन झाला आहे. त्या क्षेत्रातील अनुभव असलेल्या सात व्यक्तिना अशासकीय सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
या आयोगाच्या अध्यक्षपदी शेखर मुंदडा यांची तर सदस्यपदी वेंगुर्ला तालुक्यातील मातोंड-गोवळवाडी येथील दिपक भगत यांची अशासकीय सदस्य म्हणून निवड केली आहे.
दिपक भगत हे स्टेट बँक ऑफ इंडियामधून अधिकारी पदावरून निवृत्त झालेले असून पहिल्यापासून अभाविप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व विश्व हिदू परिषदेचे सक्रीय कार्यकर्ते म्हणून काम केलेले आहे. सन १९८७ ते १९९२ या कालावधीत अभाविपची जिल्हाप्रमुख म्हणून जबाबदारी होती. सातत्याने गो-सेवा या क्षेत्रात कार्यरत असलेले दिपक भगत यांचा नैसर्गिक शेतीवर भर असून नैसर्गिक शेतीचे प्रशिक्षण देतात. त्यांचा स्वताचा फळ प्रक्रिया उद्योग व कलम नर्सरी उद्योग आहे. अशाप्रकारे गो-सेवा प्रकल्पाशी निगडित असलेले दिपक भगत यांची महाराष्ट्र राज्याच्या ‘महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या‘ राज्यस्तरीय सदस्यपदी निवड झाल्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजपा परिवाराकडून अभिनंदन केले आहे.
फटो – दिपक भगत
