तीन मंत्रिपदे मिळून जिल्ह्याचा विकास नाही झाल्यास जनता माफ करणार नाही…

मंत्री दीपक केसरकर ; माझ्या वाढदिनी आंदोलन करणे ही त्यांची संस्कृती..

⚡सावंतवाडी ता.१६-: जिल्हाला तिन मंत्रीपदे मिळाली आहे त्यामुळे जिल्ह्याचा विकास नाही झाल्यास येणार काळात जनता आपल्याला माफ करणार नाही. त्यामुळे या जिल्ह्याचा पर्यायाने कोकणचा विकास करण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत असे मत मंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे व्यक्त केले. दरम्यान सिंधू रत्न योजनेच्या माध्यमातून किमान 100 कोटी निधी मिळावा यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत असेही केसरकर बोलताना म्हणाले ते सावंतवाडीत आपल्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलत होते.

यावेळी ते बोलतांना म्हणाले, एसटी डेपो नुतनीकरणासाठी लवकरच बीओटी तत्वावर काम हाती घेण्यात येणार आहे. त्यासाठी आपण मुख्यमंत्र्यांसमवेत चर्चा केली आहे. लवकरच हे स्थानक सुसज्ज पाहायला मिळेल. मात्र ज्यांना माझ्या वाढदिनी स्थानकाच्या प्रश्नावरून आंदोलन करायचे आहे ही त्यांची संस्कृती आहे. त्यांचा प्रश्न आहे. माझे प्रेम आजही त्याच्यावर तेवढच आहे. ते माझे उपकार विसरले असतील तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे असे केसरकर माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच नाव न घेता म्हणाले.

You cannot copy content of this page