⚡वेंगुर्ला ता.१६-: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला ३० मे रोजी ९ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल वेंगुर्ला भाजपातर्फे सुखटणवाडी येथील सायमन फर्नांडीस यांच्या निवासस्थानी जाऊन तर गाडीअड्डा तिठा येथील अनिल नाईक यांच्या चहाच्या स्टॉलवर जाऊन या दिव्यांगांना युडीआयडी कार्डचे वितरण करण्यात आले.
यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, तालुक्याध्यक्ष सुहास गवंडळकर, जिल्हा सदस्य वसंत तांडेल, तालुका सरचिटणिस बाबली वायंगणकर, तालुका उपाध्यक्ष प्रितेश राऊळ, सरपंच संघटनेचे पपू परब, बुथ प्रमुख आनंद मेस्त्री, उभादांडा ग्रामपंचायत सदस्या अस्मिता मेस्त्री इत्यादी उपस्थित होते. विविध शासकीय योजनांचा लाभ दिव्यांगांना घेण्यासाठी वैश्विक ओळखपत्र आवश्यक आहे. वेंगुर्ला तालुक्यातील बहुतांश दिंव्यांग हे युडीआयडी या कार्डापासून वंचित होते. ही अडचण लक्षात घेऊन भाजपा वेंगुर्लाच्या वतीने माजी खासदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांग प्रमाणपत्र व स्वालंबन कार्ड शिबिराचे आयोजन केले होते. सुमारे १५० दिव्यांगांनी या शिबिराचा लाभ घेतला होता. सर्व तपासण्या एकाच ठिकाणी झाल्यामुळे दिव्यांगांना प्रमाणपत्र मिळणे सोपे झाले.
फोटोओळी – अनिल नाईक यांना भाजपातर्फे युडीआयडी कार्डचे वितरण करण्यात आले.
