⚡कणकवली ता.१४-: शाळेत शिक्षक आपल्याला शिक्षा करतात तेव्हा त्याचा राग येतो मात्र त्यानी शिक्षा केल्यानतंर मी अभ्यास केला आज मोठा झालो याची जाणीव होते. आज जिल्हा परिषद शाळेची पटसंख्या कमी होत चालली आहे मात्र याच शाळेतील विद्यार्थी आज उच्च पदावर पोहचले असून शालेय जीवनापासून प्रचंड मेहनत करा तरच भविष्यात उच्च पदावर पोहचाल असे प्रतिपादन भारतीय नाविक युनयनचे अध्यक्ष रविंद्र बाईग यानी केले.
ते जि.प.केंद्रशाळा कासार्डे नं. १ येथे भारतीय नाविक युनियनच्या वतीने आयोजित केलेल्या मोफत वह्या व शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी भारतीय नाविक युनियनचे अध्यक्ष रविंद्र बाईग, जनरल सेक्रेटरी सुरेश साळसकर, सदस्य प्रशांत कदम,राजेश कनोजिया, हेमंत कांबळे, सतीश, सरोज, वासुदेव खाडये, सरपंच निशा नकाशे, उपसरपंच गणेश पाताडे, माजी सभापती प्रकाश पारकर, ग्रामविकास अधिकारी गजानन कोलते, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष गुरूप्रसाद सावंत, ग्रा.पं.सदस्य सहदेव उर्फ आण्णा खाडये, प्रणय उर्फ बाळा जोशी, विजय राणे, अभिजीत धुमाळ, मिलिंद पाताडे,उद्योजक प्रणिल शेटये, सोसायटी चेअरमन दिपक सावंत, मुख्याध्यापक दिपक पवार, मारूती मेस्त्री,श्रीकृष्ण नानचे,अरूणा वाळवेकर, विजय कदम,प्रमोद शेटये, विठोबा सावंत आदी मान्यवर व विद्यार्थी, पालक उपस्थित होते.
यावेळी बोलताना साळसकर म्हणाले, आज कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याला सुरवात झाली आहे.याची कारणे शोधण्याची गरज आहे.आज इंग्रजी माध्यमातून शिक्षणाचा कल असला तरी मराठी शाळा टिकवण्यासाठी पालकांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे.त्याचबरोबर प्रकाश पारकर, प्रशांत कदम यानी बहुमूल्य मार्गदर्शन करत कासार्डे केंद्रातील बारा शाळांना मोफत वह्या व शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. तसेच उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. मोफत वह्या व शैक्षणिक साहित्य वाटप केल्याबद्दल शाळेच्या वतीने आभार मानण्यात आले.
