परब,सावंत यांची मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे मागणी
⚡दोडामार्ग ता.१२-: आडाळी येथील एमआयडीसी प्रकल्प सुरू झाल्यास मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न करण्याची मागणी कुंब्रल ग्रामस्थ गिरीश परब व महाराष्ट्र विकास मंच अध्यक्ष जितेंद्र सावंत यांनी निवेदनाद्वारे महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री तथा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे केली आहे.
तालुक्यातील आडाळी येथे महाराष्ट्र शासनाने एम. आय .डी.सी प्रकल्प सुरू करण्यासाठी जागा संपादित केली आहे;मात्र प्रकल्प सुरू करण्याच्या दृष्टीने कोणत्याही हालचाली किंवा प्रयत्न होताना दिसत नाहीत. तालुक्यातील लोकांचा शेती हा प्रमुख व्यवसाय आहे;परंतु शिकलेल्या हजारो युवकांना नोकरीसाठी मुंबई, गोवा, पुणे या ठिकाणी जावे लागते. आडाळीचा हा प्रकल्प सुरू झाल्यास येथिल युवकांना येथेच रोजगार उपलब्ध होईल. त्यामुळे हा प्रकल्प पूर्णत्वास होण्याच्या दृष्टीने वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न करण्यात यावेत. अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
