श्री भगवती देवी नावळे विकास संस्था मुंबई आणि जय मल्हार मित्र मंडळ नावळे धनगरवाडा यांचा उपक्रम
वैभववाडी संजय शेळके
प्रतीवर्षी प्रमाणे यावर्षीही श्री भगवती देवी (नावळे) विकास संस्था मुंबई व जय मल्हार मित्रमंडळ नावळे धनगरवाडा यांच्या वतीने विद्या मंदिर नावळे धनगरवाडा शाळेसह गावतील सर्व शालेय विद्यार्थ्यांना शालेपयोगी वस्तूंचे शालेय गणवेश आणि कडुलिंबू (औषधी वनस्पती)चे वाटप करण्यात आले.
यावेळी सरपंच कुमारी सोनल गुरव, उपसरपंच संजय रावराणे, नावळे गावचे सुपुत्र वाभवे वैभववाडी नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष संजय सावंत, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेंद्र गुरव उपाध्यक्ष शर्वरी रावराणे, बिरदेवाडी शाळेचे शाळा व्यवस्थापन अध्यक्ष अनिल गुरव, भगवती देवी मुंबई मंडळाचे अध्यक्ष नामदेव गुरव, सदस्य अनिल पाटील, सचिन घाडी, जय मल्हार मित्र मंडळ नावळे धनगरवाडा प्रतिनिधी अंकिता आकाराम गुरखे, शाळा व्यवस्थापन सदस्य तथा ग्रामपंचायत सदस्य संजय शेळके, सौ रश्मी गुरव, तंटामुक्ती अध्यक्ष आत्माराम गुरव, शाळेचे मुख्याध्यापक श्री भरडकर सर, ज्योत्स्ना पाटील मॅडम, श्री माने सर,महाले सर,कृषी सहायक दिपक मसेकर,आधी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते
दरवर्षी प्रमाणे यावर्षी विद्या मंदिर नावळे धनगरवाडा शाळेसह गावातील शालेय विद्यार्थ्यांना श्री भगवती देवी नावळे संस्था मुंबई यांच्या वतीने वह्या पेन व प्रत्येक विद्यार्थ्याला दोन कडुलिंबाची झाडे देण्यात आली.तर जय मल्हार मित्रमंडळ नावळे धनगरवाडा यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटप करण्यात आले.
फोटो विद्यार्थ्यांना कडुलिंबाची झाडे व शालेय साहित्य गणवेश वाटप करताना मान्यवर छाया संजय शेळके वैभववाडी
