केवळ अभ्यासू किडा बनविल्याने पाल्य यशस्वी होवू शकत नाहीत

संजय सावंत:मुलांना खेळण्यास देण्याचे पालकांना केले आवाहन

बांदा/प्रतिनिधी
दिवसात किती तास मुलांनी अभ्यास करावा हे वेळापत्रकही पालकच ठरवतात. पण मुलांना फक्त अभ्यासू किडा बनवल्याने ते आयुष्यात यशस्वी होऊ शकतात का? तर तज्ज्ञ या प्रश्नाच उत्तर नकारात्मक देतात. मुलांना यशस्वी बनवण्यासाठी त्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी खेळणे, माैज मज्जा, गप्पा गोष्टी, नाच गाणी हे खुप महत्वाचे आहे असे प्रतिपादन विलवडे गावचे सुपुत्र तथा बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पुरातत्त्व विभागाचे निवृत्त कार्यकारी अभियंता संजय सावंत यांनी येथे केले. संजय सावंत यांच्या कुटुंबीयामार्फत प्राथमिक शाळा विलवडे- टेंबवाडी नं.२ शाळेत आयोजित विद्यार्थी वार्षिक गुणगौरव सोहळा संपन्न झाला.  त्यावेळी श्री सावंत यांनी मुलांना व पालकांना मार्गदर्शन केले.
शाळेच्या शैक्षणिक प्रगतीचे कौतुक करीत विलवडे गावात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग घेण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. यावेळी सरपंच प्रकाश दळवी, माजी उपसभापती कृष्णा सावंत, वंदना सावंत, केंद्रप्रमुख नरेंद्र सावंत, केंद्रप्रमुख संदीप गवस, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रश्मी सावंत, ग्रामपंचायत सदस्या अपर्णा दळवी, अजित दळवी, उपाध्यक्ष प्राजक्ता दळवी, समिर सावंत, मानसी सावंत, धनश्री सावंत, श्रावणी सावंत, देवानंद सावंत, संजय रा. सावंत, महेद्र सावंत, विठ्ठल सावंत, विश्वनाथ सावंत, सुरेश सावंत, मालू लांबर, सुभाष कानसे, रमण सावंत, सायली दळवी, मनाली दळवी, पूर्वा दळवी, आरोही सावंत, समिधा सावंत, सुनिल सावंत, समिक्षा सावंत, अश्वीनी सावंत, संपदा सावंत आदीसह ग्रामस्थ, पालक उपस्थित होते. यावेळी विलवडे टेंबवाडी शाळा नं २ आणि अंगणवाडी, मळावाडी व टेंबवाडी येथील आजी-माजी  शाळेतील विद्यार्थी, तसेच विविध स्पर्धा व परीक्षांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. तसेच मान्यवर, सर्व विद्यार्थी व शिक्षक यांना शैक्षणिक साहित्य सह भेटवस्तू प्रदान करण्यात आल्या.
यावेळी नरेंद्र सावंत यांनीही शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सुत्रसंचालन मुख्याध्यापक सुरेश काळे यांनी केले तर आभार सहशिक्षिका प्रमिला ठाकर यांनी मानले.
फोटो:-
विलवडे टेंबवाडी शाळा नं.२ प्रशालेत विद्यार्थी, तसेच विविध स्पर्धा व परीक्षांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा संजय सावंत व वंदना सावंत यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. (छायाचित्र – निलेश मोरजकर)

You cannot copy content of this page