⚡कणकवली ता..१०-: विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन ,नियोजन शैक्षणिक व प्रशासकीय कामगिरी ,विद्यार्थी व शाळेच्या प्रगतीसाठी दिला जाणारा हा जिल्हास्तरीय या वर्षीच्या पुरस्कार ज्ञानदा शिक्षण संस्था संचालित आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स वरवडेच्या मुख्याध्यापिका सौ. अर्चना शेखर देसाई याना देण्यात आला.
राष्ट्रीय स्तरावर सायन्स ऑलिंपियाड फाऊंडेशन कार्य करते सायन्स / मॅथस/ बुद्धिमत्ता या विषयात विद्यार्थ्यांची प्रगती व्हावी या हेतूने दर्जेदार गुणवत्तापूर्वक परीक्षा घेतल्या जातात त्यामधून गुणवत्तेच्या आधारे क्रमांक ठरवुन विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले जाते
गतवर्षी घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये आयडियल इंग्लिश स्कूल वरवडेच्या कु.दिया जयराम प्रभुदेसाई हिने राज्यात ४ था क्रमांक तर आर्यन ऋषिकेश यादव याने राज्यात ७ वा क्रमांक पटकावला . याशिवाय २० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सुवर्ण/ रौप्य/ कांस्य पदके प्राप्त केली
या पुरस्कार अंतर्गत सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन नुकतेच त्यांना सन्मानित करण्यात आले या निमित्ताने व्यासपीठावर संस्थेचे उपाध्यक्ष मोहन सावंत ,कार्याध्यक्ष बुलंद पटेल ,सचिव प्रा. हरिभाऊ भिसे,सल्लागार डी. पी .तानावडे हे उपस्थित होते .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हेमंत पाटकर यांनी केले तर सर्वांचे आभार श्री.तानावडे यांनी मानले.
सौ.अर्चना देसाई याना प्राप्त झालेल्या या पुरस्काराबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ.विद्याधर तायशेटे, सहसचिव निलेश महिंद्रकर आणि खजिनदार सौ.शीतल सावंत यांनी अभिनंदन केले आहे.
