⚡कुडाळ ता.१०-: आदर्श एज्युकेशन सोसायटी संचलित नॅशनल इंग्लिश मिडीअम स्कूल नडगिवे येथे पर्यावरण सप्ताह समारोप झाला या प्रसंगी झालेल्या कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापक कौस्तुभ देसाई, संस्था समन्वयक पराग शंकरदास यांसह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी श्री मिथिलेश देसाई उपस्थित होते.त्यांनी निरनिरळ्या प्रकारच्या फणसाच्या झाडांची लागवड केली आहे.विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की शेती ही शेती म्हणून न करता ती व्यवसाय म्हणून करावी तसेच भविष्यात याचा काय उपयोग होणार आहे या बाबत माहिती दिली यांचा प्रशालेच्या वतीने शाल,मानपत्र व तुळशीचे रोप देवून सन्मान करण्यात आला.शिक्षक प्रतिनिधी ओंकार गाडगीळ यांनी या सप्ताहात कोणते उपक्रम राबवले तसेच या निमीत्त निबंध स्पर्धा,चित्रकला स्पर्धा तसेच टाकवू पासून टिकावू वस्तू कशा बनवाव्या इ .स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते या विषयी माहिती दिली व या स्पर्धांचा निकाल जाहीर करण्यात आला. सोहळ्याची सांगता शाळेचे मुख्याध्यापक कौस्तुभ देसाई यांच्या मार्गदर्शन पर भाषणाने झाली.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता 9वी तील विद्यार्थिनी ईशा गिरकर हिने केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले
नॅशनल इंग्लिश मिडीअम स्कूल नडगिवे येथे पर्यावरण सप्ताह समारोप
