⚡वेंगुर्ला ता.१०-: उभादांडा-सिद्धेश्वरवाडी येथील स्त्रीरत्न प.पू.आई नरसुले यांची ३६वी पुण्यतिथी गुरुवार दि. १३ जुलै रोजी विविध कार्यक्रमांनी साजरी होत आहे.
यानिमित्त पहाटे ५ वाजता काकड आरती, ८ वाजता समाधीवर अभिषेक, ११ वाजता ह.भ.प.सावळाराम कुर्ले बुवा यांचे कीर्तन, दुपार १ वाजता आरती व महाप्रसाद, सायंकाळी स्थानिकांची भजने, रात्रौ ब्राह्मण प्रासादिक भजन मंडळ भेंडमळा यांचे भजन होणार आहे. या दिवशी कामिका एकादशी असल्याने सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन व्यवस्थापक मोहनदास नरसुले यांनी केले आहे.
