गुरुपौर्णिमेनिमित्त रोटरी क्लबतर्फे मालवणातील शिक्षकांचा सत्कार

⚡मालवण ता.०३-: गुरुपौर्णिमेनिमित्त रोटरी क्लब मालवण तर्फे गेली अनेक वर्षे शैक्षणिक क्षेत्रात ज्ञानदानाचे अजोड कार्य करणाऱ्या मालवणातील चार शिक्षकांचा तसेच एका क्रीडा शिक्षकाचा सत्कार करून त्यांना सन्मानित करण्यात आले.

यामध्ये मालवण येथील टोपीवाला हायस्कुलचे शिक्षक श्री. चंद्रशेखर बर्वे, कुडाळकर हायस्कुलच्या मुख्याध्यापिका सौ. नंदिनी साटलकर, प्राथमिक शाळा मालवण केंद्र प्रमुख अन्वर शेख, टोपीवाला कनिष्ठ महाविद्यालयाच्या शिक्षिका सौ. सुविधा तिनईकर तसेच मालवण टेबल टेनिस अकॅडमीचे क्रीडा शिक्षक श्री. विष्णू कोरगांवकर यांचा रोटरी क्लब तर्फे सत्कार करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. गुरुपौर्णिमेनिमित्त झालेल्या या सत्काराने शिक्षकही भारावून गेले तसेच सत्काराबद्दल रोटरीचे आभार व्यक्त केले.

यावेळी रोटरी क्लब मालवणचे
अध्यक्ष अभय कदम, सचिव संदेश पवार, रमाकांत वाक्कर, उमेश सांगोडकर, सुहास ओरसकर, भाऊ साळगांवकर, प्रसन्नकुमार मयेकर, अमरजित वनकुद्रे, अवि नेरकर, संजय गावडे, रंजन तांबे आदी रोटरी सदस्य उपस्थित होते.

You cannot copy content of this page