तिरोडा, नाणोस जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

मनसेने राबविला उपक्रम

सावंतवाडी
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने शनिवारी सावंतवाडी तालुक्यातील तिरोडा, नाणोस येथील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मुलांना वह्या पेन वाटप करण्यात आले.
सावंतवाडी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे रत्नागिरी सिंधुदुर्ग संपर्क अध्यक्ष अमोल साळुंखे, जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार यांच्या संकल्पनेतून वह्या,पेन शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन मनसेचे तिरोडा मा शाखाअध्यक्ष तथा म.न.वि.से जिल्हा सहसचिव मनोज कांबळी प्रणित तळकर यांनी केले. यावेळी माजी उपशहरअध्यक्ष शुभम सावंत, माजी विभाग प्रमुख मंदार नाईक, प्रशांत सावंत, दादा पालकर, उपस्थित होते. या उपक्रमावेळी प्रशालेतील शिक्षक वर्ग सहित पालक उपस्थित होते. यावेळी सदर प्रशालेतील मुख्याध्यापकांनी उपस्थित मनसेच्या पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देत आभार मानले वं मनसेच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.

You cannot copy content of this page