⚡कणकवली ता.०२-: ग्रामपंचायत किर्लोसच्यावतीने कृषी दिन साजरा करण्यात आला .यावेळी शाळा किर्लोस गावठण, शाळा किर्लोस आंबवणे, शाळा किर्लोस भावेवाडी येथे वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी किर्लोस ग्रामपंचायत सरपंच सौ. साक्षी चव्हाण, उपसरपंच अजित लाड, किर्लोस पोलीस पाटील किशोर लाड, ग्रामपंचायत सदस्य प्रवीण घाडीगावकर, गुरुनाथ चव्हाण, किशोर किर्लोस्कर यांच्यासह किर्लोस गावठाणवाडी शाळेचे मुख्याध्यापिका सौ. राणे, किर्लोस आंबवणे शाळेचे मुख्याध्यापक श्री शेंगाळ,किर्लोस भावेवाडी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. शिवानी पाताडे,शिक्षिका सौ. मानसी राणे, सुनिल भावे,शिवाजी भावे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी आंबा कलम,पेरू कलम,
लिंबू कलम,शेवगा,पपई ,शोभिवंत फुलझाड यांचे रोपण करण्यात आले.