⚡दोडामार्ग ता.०१-: धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने श्री शांतादुर्गा माध्यमिक विद्यालय पिकुळे या प्रशालेत मार्च 2023 परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केलेल्या विदयार्थाचा सत्कार समारंभ नुकताच संपन्न झाला या प्रशालेच्या प्रथम तीन क्रमांक पटकावला त्यांचे व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे 100 टक्के निकाल लावल्याबददल धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्री डॉ.मिलिंद प्रतापराव तोरसकर यांनी अभिनंदन केले.
यावेळी त्यांनी पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना योग्य निर्णय घेउन शाखा निवडावी आसे आवाहन केले त्यामुळं चांगले करिअर घडवू शकतात असेही त्यांनी सांगितले यावेळी संस्थेच्या कार्यकारी मंडळ सदस्या तथा सचिव, समन्वय समिती सौ. रश्मी तोरसकर, सहसचिव नंदकुमार नाईक ,शाळा समिती सदस्य रामचंद्र गवस, निमंत्रित सदस्य अनिल शेटकर,मुख्याध्यापिका स्नेहल गवस, श्री जयसिंगराव वाघमोडे , एन पी कांबळे, अनुजा सावंत, अशोक आंबुलकर आदीं सह शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते यावेळी मान्यवरांच्या हस्ते इ.10 वी परीक्षेत प्रथम तीन क्रमांक प्राप्त कु. प्राजक्ता गवस, आदिती नाईक, गौरी नाईक, गायत्री गवस आदीं विद्यार्थाचे गुलाबपुष्प देउन अभिनंदन करण्यात आले तसेच जवाहर नवोदय विद्यालयांसाठी प्रवेश मिळाला त्याबद्दल कु. विश्वजित गोपाळ पाटील याचेही गुलाब पुष्प देउन अभिनंदन करण्यात आले यावेळी पालक शिक्षिका सौ. मिनल पाटील यांचेही अभिनंदन केले यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत सर्वांना शुभेच्छा देण्यात आल्या.
