बांबू लागवडीत आर्थिक क्रांती केल्याने होणार सन्मान
⚡सावंतवाडी ता.०१-: आर्थिक क्रांती बांबू लागवडीतून करणार्या कोलगाव येथील माजी जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा यांचा कोकण आयडॉल या पुरस्काराने गौरव जाहीर करण्यात आला आहे. कोकण भूमि प्रतिष्ठान कोकण क्लब यांच्या माध्यमातून हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्काराचे वितरण १६ जुलैला दादर येथे होणार आहे.
