⚡मालवण ता.०१-: श्री रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर, आचरा या संस्थेने सोमवार दि.३ जुलै २०२३ रोजी ठीक १०.३० वाजता कृषिविषयक पुस्तके व कृषिविषयक संदर्भ ग्रंथाचे ग्रंथप्रदर्शन संस्थेच्या वाचन कक्षात आयोजित केले आहे. तसेच संस्थेचे कार्यकारिणी सदस्य श्री. भिकाजी कदम यांच्या
परसबागेत वृक्षारोपणाचा कार्यक्रमही आयोजित केला आहे .
या कार्यक्रमास आचरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल व्हटकर,,बँक ऑफ इंडिया शाखा- आचरा . शाखाधिकारी भाग्यश्री कुलसंगे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
तरी सर्व वाचन प्रेमी आणि कृषीप्रेमींनी ग्रंथप्रदर्शनाचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेच्या सर्व कार्यकारिणी व सांस्कृतिक समिती सदस्यांनी केले आहे.
