⚡मालवण ता.२९-: मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचे हिंदी विषयाचे प्राध्यापक श्री. एच. एम. चौगले यांच्या सुविद्य पत्नी सौ. कल्पना हंबीरराव चौगले या पुणे विद्यापीठाद्वारे घेण्यात येणारी (महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा) सेट परीक्षा अर्थशास्त्र विषयातून उत्तीर्ण झाल्या.
कौटुंबिक जबाबदारी सांभाळून सेट सारखी परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. त्याचबरबरीने मागे झालेल्या tait परीक्षेमध्ये सुद्धा त्यांनी उत्तम गुण मिळवून यश संपादन केले आहे.
