⚡मालवण ता.२९-:
युवतीचा अश्लिल फोटो बनवून त्याची इन्स्टाग्रामवर स्टोरी प्रसारीत करून युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी तुकाराम भिमराव सुर्यवंशी (वय २२, रा.धावडेवस्ती, भोसरी पुणे) याची मालवण येथील मे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी तथा सह दिवाणी न्यायाधीश यांनी सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. सूर्यवंशी याच्या वतीने अॅड. स्वरूप नारायण पई यांनी काम पाहीले.
अश्लिल फोटो इन्स्टाग्रामवर प्रसारीत केल्याच्या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता
