उंडील येथे वैश्य समाजातर्फे
साजरी होणार गुरुपौर्णिमा

⚡कणकवली ता.२९-; वैश्यगुरू प. पू.श्री श्री वामनाश्रम म्हास्वामींच्या सुचनेनुसार उंडील ता. देवगड येथील नवीन गुरुमठात सोमवार 3 जुलै 2023 रोजी सकाळी 11 वा श्री व्यास गुरुदेव व श्री श्री वामनाश्रम महस्वामी यांच्या पूजाअर्चा करून गुरू पौर्णिमा उत्सव साजरा केला जाणार आहे. त्यासाठी सर्व वैश्य बंधू भगिनींनी बहुसंख्येने नियोजित ठिकाणी उपस्थित राहायचे आहे. यावेळी महिला भगिनींचे सत्संग,भजनासह दुपारी 2 ते 3 या वेळेत महाप्रसादाचीही व्यवस्था करण्यात आली आहे.


कणकवली येथील वैश्य बंधू भगिनींसाठी 3 जुलै 23 रोजी सकाळी 9 ते 9-30 वाजता पटवर्धन चौक कणकवली येथुन उंडील येथे जाण्यासाठी 17 सीटर बसची सोय करणेत आली आहे. यासाठी सौ नीलम धडाम कणकवली 9423884416 वर संपर्क साधावा. या कार्यक्रमात समाज बांधवांनी सहभागी व्हावे असे आवाहन सीताराम उर्फ दादा कुडतरकर,कार्याध्यक्ष, संतोष टक्के,कार्यवाह,वैश्य गुरुमठ सेवा समिती व कार्यकारिणी शाखा उंडील,जिल्हा सिंधुदुर्ग तसेच दीपक अंधारी, जिल्हाध्यक्ष,वैश्य गुरू सेवा समिती,सिंधुदुर्ग यांच्या वतीने करण्यात आले आहे. अशी माहिती दादा कुडतरकर यांनी दिली.

You cannot copy content of this page