कणकवलीचे मुख्याधिकारी “ऑन फिल्ड”

सुट्टीदिवशी रस्त्यावर उतरत केला रस्ता वाहतुकीस सुरळीत

⚡कणकवली ता.२९-: पावसाने कणकवली नरडवे रोडवर पाणी साचल्याने याची तात्काळ दखल घेत कणकवलीचे मुख्याधिकारी अवधूत तावडे यांनी सुट्टी दिवशी ऑन फिल्ड उतरत नरडवे रोडवर मोठ्या प्रमाणावर साचलेल्या पाण्याचा निचरा करून घेतला. कर्मचाऱ्यांकडून हे काम करून घेत असताना मुख्याधिकारी श्री. तावडे हे जातीनिशी या ठिकाणी उपस्थित होते.


नरडवे रोडवर माजी आमदार राजन तेली यांच्या घरा नजीक रस्त्यावर गटारात पाण्याचा निचरा होत नसल्याने मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. रेल्वे स्टेशनच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यालगत पाणी साचल्याने पादचाऱ्यांना चालत जाताना त्रास सहन करावा लागत होता. ही बाब मुख्याधिकारी श्री. तावडे यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तात्काळ याची दखल घेत कर्मचारी मनोज धुमाळे, विनोद जाधव, कचरा ठेकेदार मिथुन ठाणेकर, तुषार कांबळे यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांच्या मार्फत या पाण्याचा निचरा करून घेतला. त्यामुळे काही वेळातच या रस्त्यावर साचलेले पाणी निचरा होत वाहतूकीस रस्ता वाहतुकी सुरळीत झाला.

You cannot copy content of this page