वक्तृत्व स्पर्धेत दीपा आरोसकर प्रथम

⚡वेंगुर्ला ता.२९-: आकार फाऊंडेशन सिंधुदुर्ग यांच्यावतीने तुळस येथे जैतीर विद्यालयात समता आणि बंधुता याची शिकवण देणा-या, शिक्षण, आरोग्य, कृषी, उद्योग, कला, क्रीडा अशा सर्व क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाया ‘लोककल्याणकारी‘ लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

  या कार्यक्रमाच्या निमित्ताने घेतलेल्या वक्तृत्व स्पर्धेत १३ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यात प्रथम-दीपा आरोसकर, द्वितीय-राजदत्त परब, तृतीय -साक्षी परब, उत्तेजनार्थ-अनुजा मेस्त्री, राज मेस्त्री, विधी सावंत यांनी पटकावला. यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. यावेळी आकार फाऊंडेशनचे सचिव समीर वालावलकर, सदस्य भगवान चव्हाण, प्रविण कांदळकर, रोशन राऊळ, कोरो इंडिया लिडर करिश्मा परब, मुख्याध्यापक श्री.सावंत, सहशिक्षक सोमवंशी, भगत उपस्थित होते.
You cannot copy content of this page