कुडाळ येथे प्रेरणा परिषद आणि पुरस्कार वितरण कार्यक्रम संपन्न

⚡कुडाळ ता.२९-: कुडाळदेशकर गौड ब्राह्मण सहयोग, डोंबिवली व कुडाळदेशस्थ विद्यावृद्धी समाज, गिरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने “प्रेरणा परिषद आणि पुरस्कार वितरण सोहळा – २०२३” हा कार्यक्रम मराठा मंदिर हॉल, कुडाळ येथे पार पडला. कु. स्वरांगी खानोलकर हिच्या सादर केलेल्या गणेश वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. तर श्रीमती विनया सामंत यांनी प्रास्ताविक केले.

यावर्षी प्रेरणा परिषदेत प्रा. विद्याधर वालावलकर- अध्यक्ष, पर्यावरण दक्षता मंडळ, ठाणे यांचे पर्यावरणपूरक व्यवसाय या विषयावर प्रफुल्ल वालावलकर यांनी मुलाखत घेतली. त्यानंतर हेमंत रा. प्रभूकेळुसकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, हिरानंदानी उद्योग समूह यांचा व्यावसायिक प्रवास उलगडणारी मुलाखत गणेश देसाई आणि प्रथमेश नाईक यांनी घेतली. दोन्ही सुसंवाद हे अत्यंत माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी होते.
या वर्षीच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात परुळे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आणि सामाजिक कार्यकर्ते प्रदीप वासुदेव प्रभू यांना कामगार नेते डॉ. दत्ता सामंत स्मृती सामाजिक कार्य पुरस्कार – २०२३ व देवरूखच्या डिग्री कॉलेजचे प्राचार्य डॉ. नरेंद्र परशुराम तेंडोलकर यांना शिक्षणतज्ञ रामभाऊ परुळेकर आणि मुख्याध्यापक बाबुराव परुळेकर स्मृती शैक्षणिक कार्य पुरस्कार २०२३ प्रदान करण्यात आला. प्राचार्य तेंडोलकर यांनी पुरस्काराची रक्कम स्वतःची भर घालून संस्थेच्या कार्यासाठी देणगी रूपाने परत केली. प्रतिवर्षी प्रमाणे दहावी, बारावीची परीक्षा यशस्वीपणे उत्तीर्ण करणाऱ्या, पदवी, पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करणाऱ्या ६५ विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात आली.

खडतर परिश्रम मुलांनी घ्यावेत!

यावेळी हिरानंदानी ग्रुपचे सीईओ
हेमंत प्रभूकेळुस्कर आपल्या मुलाखतीत म्हणाले की, आजच्या काळात परिश्रम महत्वाचे आहे. आजच्या मुलांनी दुसऱ्या बरोबर स्पर्धा न करता ती स्वतः बरोबर करावी. तरच आपले धेय्य साधता येईल. पालकांनी सुद्धा आपली मुलांच्या शिक्षणाबाबत सजग राहणे गरजेचे आहे. आज आपल्या समाजातील अनेक मुलांनी उत्तुंग यश संपादन केले आहे. पण यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतलेत.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित विद्यार्थ्याना कै. सहदेव नारायण उर्फ अण्णासाहेब माईणकर शैक्षणिक साहित्य वाटप योजनेअंतर्गत उत्तम दर्जाच्या वह्या वाटप करण्यात आल्या.
या कार्यक्रमात नुकताच भारतीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत भारतात ७६ वा आलेल्या कु. वसंत दाभोलकर याचे वडील प्रसाद दाभोलकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला. तसेच सद्यपरिस्थितीत खडतर परिस्थितीशी झुंज देऊन इयत्ता बारावीत उत्तम गुण मिळवणाऱ्या ऊर्जा देसाई हिला कुडाळदेशकर महिला मंडळाने ७६ हजार जमा करून याच कार्यक्रमात सुपूर्द केले. या कार्यक्रमासाठी सर्वश्री चंद्रकांत ठाकूर, संजय दाभोलकर, प्रफुल्ल वालावलकर, संजय ठाकूर, बाळू धामापूरकर, पूर्वा नाईक, शामू देसाई, प्रथमेश नाईक आणि वल्लभ सामंत यांनी विशेष मेहनत घेतली. तसेच सूत्रसंचालन कु. सिद्धी ठाकूर हिने केले. या कार्यक्रमाची सांगता भोजन समारंभाने झाली.

You cannot copy content of this page