चढणीचे मासे पकडण्यासाठी सगळीकडे धावपळ

खवळे, काडी, मरल, चिंगुळ, डेमके व ठिगुर शेतात : परिसरात बेडुकांचा डराव…डराव… आवाज

⚡बांदा ता.२९-: मान्सूनच्या दमदार आगमनाने शेतकरी वर्ग सुखावला आहे. चढणीचे मासे धरण्यासाठी युवक वर्ग मोठ्या प्रमाणात नदी, ओढे व शेळजमिनीच्या (पाणथळ) ठिकाणी पहायला मिळत आहेत. खवळे, काडी, मरल, चिंगुळ, डेमके व ठिगुर यासारखे मासे पहिल्या पावसात शेतात चढले. मिळेल त्या साहित्याने मासे पकडण्यासाठी सगळे व्यस्त आहेत. तर बेडुकांच्या डराव… डराव… आवाजाने परिसरातील वातावरण दुमदुमून गेले आहे.

You cannot copy content of this page