जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे बाळा गावडे यांचे आवाहन
*💫सावंतवाडी दि.२७-:* सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटीचा आढावा घेवून संघटनात्मक बाबींवर चर्चा करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. ही बैठक गुरुवार, ४ मार्च रोजी दुपारी २:३० वाजता गांधी भवन, तन्ना हाऊस, मॅजेस्टीक आमदार निवासच्या मागे, रिगल सिनेमाजवळ, कुलाबा, मुंबई येथे होणार आहे. या बैठकीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना निमंत्रित आले आहे. बैठकीत जिल्हा अध्यक्ष व कार्याध्यक्ष, जिल्हयाचे पालक/संपर्क मंत्री, जिल्हयातील प्रदेश पदाधिकारी, जिल्हा प्रभारी पदाधिकारी, जिल्हयातील आजी माजी खासदार तसेच मागील लोकसभा निवडणूकीतील काँग्रेस पक्षाचे उमेदवार, जिल्हयातील आजी माजी आमदार तसेच मागील विधानसभा निवडणूकीतील काँग्रेस पक्षाचे उमेदवार, जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष, जिल्हयातील सर्व ब्लॉकचे अध्यक्ष, जिल्हयातील प्रदेश प्रतिनिधी, जिल्हयातील आगामी नगरपरिषद/ नगरपंचायत निवडणुकीसाठी नियुक्त केलेले निरिक्षक, जिल्हयातील सर्व आघाडी संघटनांचे जिल्हा अध्यक्ष, जिल्हयातील सर्व विभाग व सेलचे जिल्हा अध्यक्ष, जिल्हयातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपंचायत मधील काँग्रेस पक्षाचे आजी माजी सदस्य आदींना या निमंत्रित करण्यात आले असल्याचे बाळा गावडे व विलास गावडे यांनी सांगितले.
