घोणसरी प्राथ.शाळेचे तेजस तेली,भाविका भरणकर यांची नवोदयसाठी निवड

⚡कणकवली ता.२७-: एप्रिल २३ मध्ये (इयत्ता पाचवी) घेण्यात आलेल्या परीक्षेतून, वाहर नवोदय विद्यालय सांगेली – सावंतवाडी साठी फोंडाघाट – घोणसरी प्राथ. शाळा नंबर ५ मधून, तेजस तेली आणि भाविका भरणकर या मुलांची निवड करण्यात आली.

मुलांचे आयुष्य घडविण्यात या विद्यालयाचा नावलौकिक आहे. स्पर्धात्मक परीक्षेतून, गुणवत्तेच्या आधारावर, ग्रामीण भागातील वाडी वरच्या प्राथमिक शाळेतून, या दोन मुलांच्या झालेल्या निवडीबद्दल, गावात कौतुक होत आहे. या मुलांना सहशिक्षक विद्याधर पाटील यांचे यथोचित मार्गदर्शन लाभले.तेजस तेली आणि भाविका भरणकर यांचे मुख्याध्यापिका सौ. स्मिता कदम यांनी अभिनंदन करून, पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

You cannot copy content of this page