रियाज खान; बांदा पोलीस निरीक्षकांकडे निवेदनद्वारे मागणी
बांदा/प्रतिनिधी-:बांदा कट्टा सर्कल येथे शिवसेना अल्पसंख्याक तालुकाप्रमुख रियाज खान यांनी बांदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शामराव काळे यांना कट्टा कॉर्नर येथे कायमस्वरूपी पोलीस कर्मचारी नेमण्याची मागणी निवेदनाद्वारे केली.
झाराप पत्रादेवी महामार्गावर बांदा कट्टा कार्नर सर्कल जवळ वारंवार अपघाताच्या घटना वाढत आहेत. या सर्कल ठिकाणी सहा रस्ते जोडले गेल्यामुळे हा अपघात पाॅईट झाला आहे. पुणे, मुंबई, आंबोली, बेळगाव, गोवा बांदा मार्गे मोठ्याप्रमाणात पर्यटक दिवसरात्र महामार्गावरुन ये-जा सुरु असते. चौपदरी रस्त्यावर वहाने भरधाव वेगात येत असल्याने बरेच अपघात होत आहे.
याठीकाणी सायंकाळी प्रवाशांची रहदारी मोठ्या प्रमाणात असते. सर्कल ठिकाणी पोलिस चाैकी असल्याने पावसाळ्यात पणं पोलिस कर्मचारी राहण्यासाठी सोयिचे होणार आहे. असे पोलिस कर्मचारी नेमण्यासबंधी मागणी निवेदन द्वारे बांदा पोलिसांना केली आहे. यावेळी संजय आईर, मंथन गवस,व्यंकटेश ऊरुमकर, मोहसीन खान, सदा राणे आदी उपस्थित होते.
