योग दिनात माजी मुख्याध्यापक वामन खोत यांचे प्रतिपादन
⚡मालवण ता.२१-: सध्याच्या धकाधकीच्या जीवनात माणसांचे शारीरिक व मानसिक आरोग्य बिघडत चालले आहे. शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी प्रथम आपले मन स्थिर असणे आवश्यक असून त्यासाठी नियमित योगासने करणे गरजेचे आहे. योगा केल्याने आपले मन थेट परमात्म्याशी जुळते, परमात्म्याशी एकरूप होण्यासाठी योगा सारखा दुसरा मार्ग नाही असे प्रतिपादन भंडारी हायस्कुलचे माजी मुख्याध्यापक वामन खोत यांनी केले.
मालवण येथील भंडारी एज्युकेशन सोसायटी हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय मालवणमध्ये जागतिक योग दिनाचे औचित्य साधून माध्यमिक विभागात आणि कनिष्ठ महाविद्यालय विभागात
योगासने प्रात्यक्षिक कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमासाठी संस्थेचे लोकल कमिटीचे सेक्रेटरी श्री. दशरथ कवटकर, माजी मुख्याध्यापक वामन खोत ,मुख्याध्यापक एच बी तिवले, प्रा रुपेश बांदेकर, आर डी बनसोडे, आर बी देसाई, प्रा स्नेहल पराडकर , प्रा गणेश सावन्त , माध्यमिक विभागात योगासने प्रात्यक्षिके सादर करणाऱ्या योग ज्योती योगा ग्रुपच्या योग शिक्षिका सौ. दिपाली वणकुद्रे, योग साधक सौ. अनुष्का चव्हाण, योग साधक सौ. नंदिनी गावकर, योग साधक सौ. संस्कृती बांदकर, योग साधक सौ. साक्षी जुवाटकर आदी व अन्य मान्यवर उपस्थित होते प्रारंभी मुख्याध्यापक एच बी तिवले यांनी उपस्थितांचे स्वागत केले तर प्रास्ताविक प्रा रुपेश बांदेकर यांनी केले
या कार्यक्रमात मुला- मुलींनी उस्फुर्त सहभाग दर्शविला. यावेळी विध्यार्थी वर्गाने वृक्षासन, उत्कटासन, ताडासन, अर्धकाटी चक्रासन, नावासन, गोमुखश्वानासन, वीरभद्रासन प्रकार १, वीरभद्रासन प्रकार २ ही योगासने व प्राणायाम करून योग दिन साजरा केला. यावेळी शेवटी आर बी देसाई यांनी आभार मानले
