झोपलेल्या महिलेवर फॅन कोसळून तिचा मृत्यू

पवनचक्की सुमतीनगर येथील दुर्दैवी घटना

देवगड ता.२१-: पवनचक्की सुमतीं नगर येथील रहिवासी अशोक अनंत चिंदरकर (६३)यांची पत्नी सौ अंजली अशोक चिंदरकर(५३) तिची तब्येत बरी नसल्याने ती सकाळी साडेसात वाजेपर्यंत झोपलेली असताना तिच्या डोक्यावरील छपरावर असलेला पाईपचा स्क्रू गंजून फॅनचा गड्डा तूटून खबरदेणार यांच्या पत्नीच्या कुशीवर ती खाली अंथरुणामध्ये झोपलेली असताना तिच्या बरगड्यांवर पडून तिला मुका मार लागून ती तिथेच वळवळू लागली तिला पती त्यांचा पुतण्या रवींद्र प्रभाकर चिंदरकर यांनी रिक्षे तून घेऊन पुढील औषध उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय देवगड येथे दाखल केले तेथे अधिक औषध उपचार चालू असताना तेथील डॉक्टरांनी तिला तपासून मयत घोषित केले .
सदरची घटना बुधवार दि २१ जून रोजी स.९ च्या मानाने राहत्या घरी घडली.या संदर्भात देवगड पोलीस स्थानकात अशोक चिंदरकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

You cannot copy content of this page