वेताळ बांबर्डे गावातील घटना:सरपंच, उपसरपंच यांनी केली पाहणी
⚡कुडाळ ता.११-: वेताळ बांबर्डे गावातील नाना विठू राणे (राहणार :दारवळवाडी) यांच्या घरावर वीज पडून त्यांच्या घराच्या भिंतींना दोन्ही बाजूने मोठे तडे जावून घराचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच ऐन पावसात घराचे छप्पर बऱ्याच ठिकाणी कोसळले. या बाबतची माहिती मिळताच सरपंच वेदिका दळवी, उपसरपंच प्रदीप गावडे यांनी घटनास्थळी धाव घेवून पाहणी केली.
