शिवसेना उद्धव ठाकरे गटाने डीवायएसपी यांचे वेधले लक्ष
⚡कणकवली ता.१०-: कणकवली तालुक्यात निपक्षपातीपणे कारभार चालवावा तसेच जुगार, मटका, ऑनलाइन कॅसिनो, गोवा दारू विक्री व गांजा विक्री यासारखे कणकवलीत तालुक्यात चालणारे अवैध धंदे यावर लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणी शिवसेना उद्धव ठाकरे गटातर्फे प्रभारी डीवायएसपी किशोर सावंत यांच्याकडे करण्यात आली.
कणकवलीचे प्रभारी डीवायएसपी किशोर सावंत यांचे शिवसेना उद्धव ठाकरे गटातर्फे स्वागत करण्यात आले.यावेळी शिवसेना कणकवली तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत, युवासेना समन्वयक राजू राठोड, महिला प्रतिनिधी सौ. माधवी दळवी, आवसारे, महेश कोदे, निलेश सावंत आदी शिवसैनिक उपस्थित होते.
