निलेश राणे यांचा सावंतवाडी राष्ट्रवादीने केला निषेध

शरद पवार यांचे आत्मचरित्र पुस्तक भेट पाठविणार:- अर्चना घारे परब

⚡सावंतवाडी ता.०९-: शरद पवार यांच्या बद्दल माजी खासदार निलेश राणे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्या बद्दल सावंतवाडी राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर निषेध केला आहे.
यावेळी शरद पवार यांचे कृषी, कला, क्रीडा, सामाजिक, सहकार, शिक्षण अशा अनेक क्षेत्रांमध्ये मोठं काम आहे.

निलेश राणे यांना शरद पवार हे काय आहेत ? हे कळण्यासाठी आम्ही निलेश राणे यांना ‘लोक माझ्या सांगती’ हे आत्मचरित्र पुस्तक स्पीड पोस्टमार्फत कणकवली येथील त्यांच्या निवासस्थानी पाठवित असल्याची माहिती राष्ट्रवादी कोकण विभाग महिला अध्यक्ष सौ अर्चना घारे परब यांनी बोलताना सांगितले.

You cannot copy content of this page