शिवसेना शिंदे गटाने दिले छपराचे साहित्य

वादळी वाऱ्याने दोन वर्षापूर्वी रांगणा तुळसुली येथील मोहन तेंडुलकर यांचे झाले होते नुकसान

कुडाळ ता.०९-: कुडाळ तालुक्यातील रांगणा तुळसुली येथील मोहन विनायक तेंडुलकर यांच्या घराचे छप्पर दोन वर्षापूर्वी वादळी वाऱ्यामुळे उडून घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे ते बेघर होऊन बाजूला असलेल्या भावाच्या घरी पडवीत राहून जीवन जगत होते. ही बाब स्थानिक लोकप्रतिनिधींनी शिवसेना (शिंदे गट) पदाधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिली.

या चर्चेदरम्यान घरासाठी आवश्यक असलेल्या साहित्याची माहिती घेतली त्यावेळी कोणतेही आडेवेडे न घेता साहित्य देण्याची तयारी शिवसेना (शिंदे गट) पदाधिकारी यांनी दर्शविली आणि आज गुरूवार, ८ जून रोजी रांगणा तुळसुली येथील त्यांच्या घरी छप्परासाठीचे आवश्यक साहित्य पोहोच करण्यात आले.

हे सर्व साहित्य शिवसेना (शिंदे गट) जिल्हा महिला आघाडी प्रमुख वर्षा कुडाळकर, तालुका प्रमुख योगेश (बंटी) तुळसकर, महिला आघाडी तालुकाप्रमुख सिद्धी शिरसाट यांचे उपस्थितीत मोहन तेंडुलकर यांना देण्यात आले. यावेळी त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू तरळत होते. त्यांनी शिवसेना (शिंदे गट) सर्व पदाधिकारी यांचे आभार मानले.

You cannot copy content of this page