किल्ला साफसफाई मोहिमेचा २८ रोजीपासून रामगड किल्ल्यावरून शुभारंभ

मालवण पंचायत समिती आणि स्वराज्य संघटना सिंधुदुर्ग यांचा उपक्रम

*💫मालवण दि.२५-:* सामाजिक उपक्रम म्हणून मालवण पंचायत समिती आणि स्वराज्य संघटना सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने मालवण तालुक्यातील ऐतिहासिक स्थळांची साफसफाई करण्याचे नियोजित करण्यात आले आहे. या मोहिमेचा शुभारंभ रविवार दि. २८ फेब्रुवारी रोजी रामगड किल्ला येथे करून रामगड किल्ल्याची साफसफाई करण्यात येणार आहे. किल्ला साफसफाईचा हा उपक्रम कोरोना विषयक नियमांचे पालन करून करण्यात येणार आहे, अशी माहिती सभापती अजिंक्य पाताडे, उपसभापती राजू परुळेकर, गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव, तसेच स्वराज्य संघटना सिंधुदुर्गचे अध्यक्ष साईल माशेलकर, प्रथमेश वेरलकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

You cannot copy content of this page