चंद्रकात जाधव : मोदी सरकारची कामे घरोघरी पोहचविणार
⚡सावंतवाडी ता.०८-: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 9 वर्ष यशस्वी पणे कामे पूर्ण केल असून त्यासाठी तिनही विधनासभा मतदारसंघात ३० मे ते ३० जुन पर्यंत मोदी @९ अभियान राबविण्यात येणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 9 वर्षांत केलेली काम लोकांपर्यंत पोहचवण्याच काम करणर असल्याची माहिती भाजप
अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष चंद्रकांत जाधव यांनी दिली.
दरम्यान या अभियानामध्ये जेष्ठ नागरिक सत्कार तसेच ज्या मोदींच्या योजना आहेत त्या कशा लोकांपर्यंत पोहचतील यासाठी हे अभियान राबविण्यात येणार असल्याचे ही ते यावेळी बोलताना म्हणाले.
अजय सावंत, परीक्षित मांजरेकर अक्षय साईल, आदी उपस्थित होते.
