सावंतवाडी एस.टी डेपोला शिक्षणमंत्री दिपकभाई केसरकर मित्रमंडळाच्यावतीने वॉटर कुलर भेट…

⚡सावंतवाड़ी ता.०२-: सावंतवाडी एस.टी डेपो कर्मचारी वाहक चालक यांच्या मागणीनुसार एस.टी. डेपो कर्मचा-यांना शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी या हेतुने महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री दिपक केसरकर मित्रमंडळाच्यावतीने सावंतवाडी एस.टी डेपोला वॉटर कुलर विथ फिल्टर सावंतवाडी नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे यांच्या हस्ते सुपुर्द करण्यात आला.

यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख श्री. अशोक दळवी, शिवसेना तालुका प्रमुख श्री. नारायण राणे, शहरप्रमुख श्री. बाबू कुडतरकर, डेपो मॅनेजर श्री. नरेंद्र बोथे, राष्ट्रीय कर्मचारी सेना अध्यक्ष श्री. बी.बी. पाटील, श्री. गजानन नाटेकर, राष्ट्रीय कर्मचारी सेना सचिव श्री. अजित कदम, एस.टी वरीष्ठ लिपीक श्री. रामचंद्र वाडकर, एस.टी. कार्यशाळा प्रमुख श्री. संदिप मोहीते, शिवसेना उपतालुकाप्रमुख श्री. संजय माजगांवकर, श्री. विनायक सावंत, श्री. महेश सावंत, श्री. प्रशांत कोरगांवकर, श्री. राजेश जाधव, एस.टी. स्थानक प्रमुख श्री. संकेत पवार, सी. रेषा सावंत, श्री. नंदू गावडे, श्री. एकनाथ हळदणकर, एस.टी कर्मचारी व मित्रमंडळाचे कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
एस. टी. डेपोतील कर्मचारी व वाहक चालक यांना सहकार्य केलेबद्दल मित्रमंडळाचे एस.टी. डेपोच्यावतीने आभार मानण्यात आले.

You cannot copy content of this page