यंदाच्या पावसाळ्यात ५ जुलै आणि ३ ऑगस्टला समुद्राला मोठी भरती

⚡मालवण ता.०१-: जून महिना सुरु झाला असून गर्मीने त्रस्त बनलेल्या सर्वांनाच मान्सूनची आतुरता लागली आहे. हवामान विभागाच्या माहितीप्रमाणे मान्सून अंदमानवरून पुढे सरकल्याचे वृत्त आहे. मान्सूनच्या पार्श्वभूमीवर सध्या समुद्रातील अंतर्गत हालचालीना वेग आला असून यावर्षी मान्सूनचा पाऊस सुरु झाल्यानंतर जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या पावसाळी हंगामात यंदा ५ जुलै आणि ३ ऑगस्टला मोठी भरती पाहायला मिळणार आहे. या दोन्ही दिवशी भरतीची उंची सर्वाधिक म्हणजे २.२० मीटर इतकी राहणार आहे. ५ जुलैला उच्चत्तम भरतीची वेळ दुपारी १२.४५ आहे. ३ ऑगस्टला दुपारी १२ वाजून २० मिनिटांनी उच्चत्तम भरती येणार आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.

यंदाच्या पावसाळी हंगामात १ जून रोजी सकाळी ९.२० वाजता भरतीची उंची १.७३ मीटर असेल. तर रात्री ८ वाजता १.७९ मीटर एवढी राहील. त्यानंतर ३ जूनपासून भरतीची उंची २ मीटर पर्यंत वाढणार आहे. ५ आणि ६ जूनला अनुक्रमे २.१४ मीटर आणि २.१५ मीटर अशी या महिन्यातील पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक मोठी भरती येणार आहे. याच कालावधीत ४ जूनला मान्सून केरळला दाखल होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

दि. ४ जूनला दुपारी ११.३० वाजता २.०९ मी. भरतीची उंची राहणार आहे. २ ते ८ जुलैपर्यंत भरतीची उंची २ मीटरपेक्षा जास्त राहणार आहे. ४ ते ७ जुलैपर्यंतच्या कालावधीत भरतीची उंची सर्वाधिक राहील. ४ जुलैला २.१७ मीटर, ५ जुलैला दुपारी १२ वाजून ४५ मिनिटांनी २.२० मीटर, ६ जुलैला २.१८ मीटर, तर ७ जुलैला २.१४ मीटर उंचीची भरती पाहायला मिळेल. १ ते ५ ऑ गस्टला सलग मोठी भरती आहे. १ ऑ गस्टला २.११ मीटर, २ रोजी २.१७ मीटर, ३ रोजी दुपारी १२.२० मिनिटांनी २.२० मीटर एवढी, ४ रोजी २.१७ मीटर, तर ५ रोजी २.१४ मीटर उंचीची भरती असेल. ३१ ऑगस्टला २.१४ मीटरची मोठी भरती होईल. १ सप्टेंबरला दुपारी ११.४५ मिनिटांनी सप्टेंबर महिन्यातील सर्वाधिक मोठी म्हणजे २.१६ मीटरची भरती पाहायला मिळेल. २ रोजी दुपारी १२ वाजता २.१४ मीटरची भरती, तर ३ तारीखला दुपारी १२.४५ वा. २.०९ मीटरची भरती येणार आहे. २८ ते ३० सप्टेंबरला अनुक्रमे २.०२, २.०६ आणि २.०६ मीटर उंचीची भरती येणार आहे.

दरम्यान, पावसाळ्यातील उच्चत्तम भरती आणि ओहोटीच्या वेळा विचारात घेऊन समुद्र, नदी आणि खाडी किनाऱ्याच्या रहिवाशांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

You cannot copy content of this page