मालवण, दि प्रतिनिधी
मालवण तालुक्यातील काळसे सुतारवाडी येथील वामन रामचंद्र पाटील उर्फ बाबल पाटील (वय- ४५ ) या इसमाचा मृतदेह त्याच्या राहत्या घरातील पडवीच्या वाशास टॉवेलच्या साहाय्याने गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आला असून वामन पाटील यांनी आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे
मुंबई येथे कामाच्यानिमित्तने वास्तव्यास असलेले वामन पाटील हे काही दिवसांपुर्वी काळसे येथील आपल्या घरी आले होते. आज पहाटे वामन पाटील यानी आपल्या राहत्या घरातील पडवीच्या वाशास टॉवेलच्या सहाय्याने गळफास लावून घेतला . घरातील व्यक्तींच्या सकाळी ही बाब निदर्शनास येताच पोलीस पाटील विनायक प्रभु यांच्याशी संपर्क करत या घटनेची माहिती दिली. त्यानंतर कट्टा पोलीस दुरक्षेत्राचे पोलीस कर्मचारी पी. जी. मोरे आणि सिद्धेश चिपकर यांनी घटनास्थळी येत पंचनामा केला. वामन याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मालवण येथे आणला आहे.
तरुणाच्या आत्महत्येमागील नेमके कारण स्पष्ट झाले नसून पोलीस पी. जी. मोरे, सिद्धेश चिपकर अधिक तपास करत आहेत.
