⚡मालवण ता.३१-: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार माजी ग्रामपंचायत सदस्या अनुष्का गांवकर व महिला बचत गटाच्या श्रीमती पुजा आचरेकर यांना बुधवारी ग्रामपंचायत आचरा सभागृहात ग्रामपंचायत प्रशासक विनायक जाधव व ग्रामविकास अधिकारी प्रकाश कदम यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यांना शाल श्रीफळ, सन्मान चिन्ह, सन्मान पत्र, रोख रक्कम देवून गौरविण्यात आले.
सामाजिक क्षेत्रात उल्लेखनिय काम केलेल्या महिलांना या पुरस्काराने सन्मानित केले जाते.
यावेळी बोलताना अनुष्का गांवकर यांनी आचरा ग्रामपंचायत तसेच महिला व बालकल्याण,महाराष्ट्र शासनाचे आभार मानले. तसेच आचरा गावातील महिला व पुरुष ग्रामस्थ यांनी वेळोवेळी मला सामाजिक काम करण्याचं प्रोत्साहन व मार्गदर्शन दिल्या बद्ल धन्यवाद व्यक्त केले तर पुजा आचरेकर यांनी देखील महाराष्ट्र शासनाचे आभार मानले. व बचत गट समुहामार्फत महिला योजनांचा लाभ देण्यासाठी अजुन सक्षम बनू असं ते म्हणाले
यावेळी ग्रामपंचायत कर्मचारी नरेश परब, छाया कदम, रुपेश परब, गिरीधर आपकर,सिद्धेश वराडकर,सुशीला पांगे तसेच प्रशांत गांवकर, पोलीस पाटील जगन्नाथ जोशी,बचत गटाच्या सेजल आचरेकर, संगीता मांजरेकर, ठाकूर, राणे, लाड, गीता आचरेकर व अन्य ग्रामस्थ आदी उपस्थित होते.
